पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुझं हसणं तुझं बोलणं..

तुझं हसणं तुझं बोलणं खरचं खुप आवडतं मला, माझ्या मनात काय आहे कसं सांगु मी तुला.. वेळ आली कि सांगेन, खरचं किती आवडतेस तु मला.. पाहू नकोस तु रागाने, नाही सांगनार मी कुणाला.. आवडत नसेल जर मी तुला सांगून टाक तु मला, आजपासून जाणार नाही मी तुझ्या वाटेला...                     (तुझाच एक प्रेमवेडा प्रियकर.)

कोरं माझं मनं..

कोरं माझं मनं कधि वाचलस का तु, झुरत होतं ते तुझ्यासाठी कधि जानलसं का तु.. होतं माझं मनं हे खुप मोठं तुझ्यासाठी, पण, त्या मनाच्या गाभार्यात शिरून कधि पाहिलस का तु.. कोरं माझं मनं कधि वाचंलस का तु, झुरतं होतं ते तुझ्यासाठी कधि जानलस का तु..

तुझी आठवण येते पण...

तुझी आठवण येते पण, तु समोर येत नाहीस... तु माझ्या हरेक श्वासात येतेस, पण, प्रत्यक्षात नाही.. तु येण्याचा मला भास होतो, पण, तु दिसत नाहीस.. वेदना खुप होतात गं माझ्या मनात, पण, तु त्यांना समजुन घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीस.. आभाळ खुप जोरात गरजतं पण, पाऊस पडत नाही, तुला आपलं करून घ्यावसं वाटतं, पण, तु माझ्या नशिबात नाहीस...